अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

सर्व योजनांची माहिती देऊन दिनदर्शिकेचे वितरण

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अमरावती शहर कार्यकारिणी नियुक्तीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाला पश्चिम विदर्भ प्रांत अध्यक्ष पप्पू छांगाणी, जिल्हा अध्यक्ष डॉ. शशांक दुबे, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. रेवती श्रीकांत देशपांडे, शहराध्यक्ष प्रवीण जोशी गुरुजी, तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अमरावती शहर-जिल्हा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 02:18 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 02:18 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words