अमृत संस्थेमुळे गरजू आणि बेरोजगारांना मोठी संधी प्राप्त झाल्याचे प्रतिपादन
औसा (जि. लातूर) : औसा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा कुलकर्णी (चिकुर्डेकर) यांची भेट घेऊन अमृत संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका भेट दिली.
या वेळी अमृत संस्थेच्या अनेक योजनांबद्दल सविस्तर चर्चा झाली. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती घेतल्यानंतर श्रीमती कुलकर्णी (चिकुर्डेकर) यांनी समाधान व्यक्त केले. या माध्यमातून गरजू व बेरोजगारांना एक मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील गरजूंनी संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम मुळजकर - ७३९१०६५४७०
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,
विद्यानगर, लातूर.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment