नांदेडमधील गजानन देबडवार यांना मिळाला २५ हजार रुपयांचा व्याजपरतावा

अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल मानले आभार

नांदेडमधील गजानन देबडवार यांना मिळाला २५ हजार रुपयांचा व्याजपरतावा मुख्य फोटो
नांदेडमधील गजानन देबडवार यांना मिळाला २५ हजार रुपयांचा व्याजपरतावा अतिरिक्त फोटो

नांदेड : अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ अनेक व्यावसायिकांना मिळाला आहे. त्यांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील गुंडोपंत दाबका या गावातील गजानन देबडवार हेही त्यापैकीच एक. त्यांना आतापर्यंत २५ हजार रुपये व्याजपरताव्याच्या रूपाने मिळाले आहेत.

अमृत संस्थेचे संभाजीनगर विभागातील आदित्य कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात त्यांची नुकतीच एक विशेष मुलाखत घेतली. या वेळी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णीदेखील उपस्थित होते. मुलाखतीत देबडवार यांनी अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा आधार मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लक्ष्यित गटातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, तसेच नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांचे त्यांनी विशेष आभार मानले. देबडवार यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. अमृत संस्थेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, लवकरच अमृत योजनांच्या प्रसारासाठी मेळावा आयोजित करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून, गजानन देबडवार यांचा हा अनुभव प्रेरणादायी ठरणारा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

अमृत कार्यालय नांदेड - 7391065472

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना? 

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 01:59 PM News publication time | Views: 36,411 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 01:59 PM News publication time | Views: 36,411 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

P
Payal pravin shingane
15-01-2026 11:26 AM

Collage fees 40000 thousand
Aahe
Me buldana mehakar
Yethil aasun
Pune la Dr.DY.patil college la
aahe
Sc cast aajun warsekwotpanna 25000rs aahe
Mala lone milelka
Please sanga
8459416601/7057596286

S
Shripad Bharale
15-01-2026 05:39 AM

मी खुला प्रवर ता आहे माल लोण 10 दाह लाख रुपये पाहजे आहे माझे नाव श्रीपाद हाराळे आहे नांदेड मदे राहतो मला लोण मी आर्थिक परिस्थिती दुर्बल घटक मदे आहे। वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आत आहे। मला। लोण ची गरज आहे। मदत मिळाले का माझं संपर्क 8087562619 9270727165

Write a Comment
0 / 50 words