अमृत दिनदर्शिकेमुळे जनजागृती होऊन योजनांची माहिती पोहोचेल व्यापक स्तरावर

अमरावतीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

अमृत दिनदर्शिकेमुळे जनजागृती होऊन योजनांची माहिती पोहोचेल व्यापक स्तरावर मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे तयार करण्यात आलेली अमृत दिनदर्शिका अमरावती जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांना भेट म्हणून देण्यात आली. या वेळी श्री. दाणेज यांनी दिनदर्शिकेची मांडणी व उपयुक्त माहितीबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले.

या दिनदर्शिकेमुळे नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जागृती निर्माण होऊन अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही केवळ दिनदर्शिका नसून, ते अमृत संस्थेच्या योजना, स्वयंरोजगाराला चालना देणारे उपक्रम, कौशल्यविकास व प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती देणारे प्रभावी मार्गदर्शक साधन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमृत दुर्गोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद आणि संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार आणि प्रशिक्षणविषयक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

केदार गोगरकर - ९११२२२७६३५

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 01:28 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 01:28 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words