समाजजागृतीचे प्रभावी माध्यम
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अमृत दिनदर्शिकेचे अमरावती जिल्ह्यात लक्ष्यित गटातील नागरिकांना वितरण सुरू आहे. अमरावतीत आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष किशोर नालमवार, उपाध्यक्ष पंकज कापशेटवार व सचिव विनोद कोटावर यांची भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली. दिनदर्शिकेत इंग्रजी तारखांबरोबरच हिंदू पंचांगाचाही ठळकपणे समावेश केल्याबद्दल मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.
समाज सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या मान्यवरांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अमृत दिनदर्शिकेमुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळत असून, ती दिनदर्शिका समाजजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - ९११२२२७६३५
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment