गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार

तहसीलदार हेमंत गागोंडे यांना दिनदर्शिकेची भेट

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार मुख्य फोटो
मुख्य फोटो

एटापल्ली : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. आपल्या योजनांच्या माहितीप्रसारासाठी संस्थेने दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. ही दिनदर्शिका गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही योजनाप्रसाराचे काम करणार आहे. एटापल्ली तालुक्याचे तहसीलदार हेमंत गागोंडे यांची अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांना ही दिनदर्शिका भेट दिली. या वेळी अमृत संस्थेच्या योजनांची माहितीही त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेच्या योजनांचा प्रचारफलक शाळा, तहसील कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार गागोंडे यांनी दिले.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/



Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 188 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news
Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 188 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words