भाजप उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी यांचे गौरवोद्गार
छत्रपती संभाजीनगर : 'अमृत संस्थेच्या माध्यमातून दिले जाणारे उद्योग प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि त्यासोबत राबवली जाणारी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना हे सारे म्हणजे खरोखरच दुग्धशर्करा योग आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यक्तींनी संस्थेच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा,' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी यांनी केले. अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी श्री. कुलकर्णी यांचे स्वागत करून अमृत दिनदर्शिका त्यांना भेट दिली. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उद्योगाभिमुख व रोजगारक्षम योजनांची सविस्तर माहितीही त्यांना देण्यात आली. वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेविषयीही सांगण्यात आले. हे जाणून घेतल्यावर अमोल कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संस्थेकडून नवउद्योजक घडवण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि त्यासोबतच वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना उद्योजकांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment