अमरावतीत जाधव पॅलेसमध्ये अमृतच्या योजनांची माहिती देणारा स्टॉल

संस्थेच्या कल्याणकारी योजनांची नागरिकांनी घेतली माहिती

अमरावतीत जाधव पॅलेसमध्ये अमृतच्या योजनांची माहिती देणारा स्टॉल मुख्य फोटो
अमरावतीत जाधव पॅलेसमध्ये अमृतच्या योजनांची माहिती देणारा स्टॉल अतिरिक्त फोटो

अमरावती : शहरातील जाधव पॅलेस येथे आयोजित प्रदर्शनामध्ये अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही संस्था कार्यरत आहे.

या संस्थेतर्फे कर्ज व्याजपरतावा, शिक्षणसाह्य व स्वयंरोजगाराशी संबंधित योजनांबाबत नागरिकांनी माहिती घेतली. पात्रता, अर्जप्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व लोकाभिमुख उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अमृत संस्थेच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमृतच्या योजना उपयुक्त असून, अधिक माहितीसाठी अमृत कार्यालयाला भेट देणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

केदार गोगरकर - 9112227635

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 04:09 PM News publication time | Views: 247 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 04:09 PM News publication time | Views: 247 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words