नगराध्यक्षा आणि माजी नगराध्यक्षांनी अमृत दिनदर्शिकेची केली प्रशंसा
लातूर : लातूरमधील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेची अनोखी दिनदर्शिका परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांना भेट देण्यात आली. नगराध्यक्षांचे या वेळी अभिनंदन करण्यात आले. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याची माहिती आवर्जून जाणून घेतली. अमृत दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
इतर उपस्थित नागरिकांकडूनही अमृत संस्थेच्या योजनांचे कौतुक करण्यात आले. यावेळी ब्राह्मण समाजातील संजय निलेगावकर, संजय अयाचित, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, जगदीश कुलकर्णी, अमृत संस्थेचे लातूर जिल्हा उप व्यवस्थापक विनोद अपसिंगेकर, पत्रकार वामन पाठक, अमृतमित्र मकरंद रामपुरे, प्रा. सुधाकर जोशी आदी अनेक नागरिक उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम मुळजकर - ७३९१०६५४७०
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
विनोद अपसिंगेकर - ७४९९४२४३५५
जिल्हा उपव्यवस्थापक
अमृत जिल्हा कार्यालय :
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,
विद्यानगर, लातूर
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment