अंबाजोगाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन

शहरात लवकरच अमृत संस्थेचा मेळावा आयोजित करण्याबद्दल सकारात्मक चर्चा

अंबाजोगाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे अमृत संस्थेकडून अभिनंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेची दिनदर्शिका सप्रेम भेट म्हणून दिली. अमृत संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल समाजघटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. अमृत कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, कर्जावरील व्याजपरतावा, मार्गदर्शन व प्रशिक्षण आधारित योजना, तसेच समाजोपयोगी उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. ही सारी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच अंबाजोगाईत अमृत मेळावा आयोजित करण्याबाबत या वेळी ठोस व सकारात्मक चर्चा झाली.

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमृत करत असलेले कार्य अत्यंत उपयुक्त व काळाची गरज असल्याचे नमूद केले. अंबाजोगाई शहरात अमृत संस्थेचे उपक्रम अधिक व्यापकपणे पोहोचावेत, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पालिकेच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. अंबाजोगाई शहरासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words