बीडच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार 'अमृत'वाणी!

अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जागृतीसाठी खास मुलाखतींचे प्रसारण

बीडच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार 'अमृत'वाणी! मुख्य फोटो
बीडच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार 'अमृत'वाणी! अतिरिक्त फोटो

बीड : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. अमृत संस्थेचे बीड जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी बीड आकाशवाणी केंद्राचे गोपाल ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन अमृत दिनदर्शिका आणि माहितीपुस्तिका त्यांना भेट म्हणून दिली. या वेळी त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. दिनदर्शिका उत्कृष्ट आणि आशयपूर्ण असल्याचे मत त्यांनी नोंदवले.

समाजोपयोगी, युवकांना दिशा देणाऱ्या आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अमृत संस्थेच्या उपक्रमांचा आकाशवाणी केंद्रावरून प्रसार करण्याची विनंती ठाकूर यांना करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन गोपाल ठाकूर यांनी अमृत संस्थेच्या प्रतिनिधींच्या दोन वेगवेगळ्या मुलाखती घेण्याचे निश्चित केले आहे. या मुलाखतींचे रेकॉर्डिंग लवकरच आकाशवाणी केंद्रावर होणार आहे. आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमातून अमृत संस्थेच्या योजना व उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याने, खुल्या प्रवर्गातील युवक-युवती व उद्योजकांना याचा मोठा लाभ होणार आहे. ही भेट अमृत संस्थेच्या कार्याला व्यापक स्तरावर पोहोचविण्यास महत्त्वाची ठरणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Digambar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Digambar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words