अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथांनी लोकांपर्यंत पोहोचवली योजनांची परिणामकारकता

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बीडमधील कार्यक्रमात झाली चर्चा

अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथांनी लोकांपर्यंत पोहोचवली योजनांची परिणामकारकता मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथांनी लोकांपर्यंत पोहोचवली योजनांची परिणामकारकता अतिरिक्त फोटो

बीड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बीड शाखेच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या वार्षिक कार्यक्रमात यंदा अमृत संस्थेची आणि योजनांची चर्चा झाली. या योजनांमुळे घडलेल्या यशोगाथांमुळे या संस्थेचे कार्य सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत झाली. अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली शासनाची स्वायत्त संस्था आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बीड शाखेतर्फे दर वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी उपस्थितांना अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अमृत कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत कौशल्य उपक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, ड्रोन प्रशिक्षण, टंकलेखन परीक्षा अर्थसाह्य, AIIMS, IIT, IIIT, IIM यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये शिक्षणासाठी मिळणारे अर्थसाह्य, तसेच सीडॅक व सिपेट या संस्थांमधील शिक्षणासंदर्भातील मदत आणि स्पर्धा परीक्षा अर्थसाह्य अशा योजनांच्या माहितीचा समावेश होता. जिल्ह्यातील विविध योजनांचे लाभार्थी व त्यांच्या यशोगाथा आकडेवारीसह उपस्थितांसमोर मांडण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांना अमृत संस्थेच्या कार्याची व्यापकता व परिणामकारकता प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.

याच कार्यक्रमात 'बीबीएन'चे सागर कुलकर्णी, तसेच वधू–वर सूचक मंडळाचे नितीन कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाने एकत्र येऊन अमृत संस्थेसारख्या उपक्रमांना पाठबळ दिल्यास तरुणांसाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, प्रदेश पदाधिकारी अ‍ॅड. रवी देशमुख, अ‍ॅड. नरेंद्र होळकर, विनायक वझे, विनायक जोशी, अ‍ॅड. विलास जोशी, अनिल कुलकर्णी, अ‍ॅड. अक्षय भालेराव, अ‍ॅड. आनंद पाटील, हेमंत गोंदीकर, अमोल आगवान, प्रकाश चैतन्य काका, वसंत थिगळे, अमोल कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, मयूर देशपांडे, ज्ञानेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वझे यांनी केले, तर अमोल आगवान यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित नागरिकांनी विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा केली. गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवणारे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी यांचे विशेष कौतुक करण्यात आले. अमृत संस्थेच्या योजना समाजासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words