अमृत जागतिक व्यापार प्रशिक्षणातून लाभार्थ्यांना मिळाली नवी दिशा

व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समधून संवाद साधून केले मार्गदर्शन

अमृत जागतिक व्यापार प्रशिक्षणातून लाभार्थ्यांना मिळाली नवी दिशा मुख्य फोटो
मुख्य फोटो

नागपूर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जागतिक व्यापार अर्थात इम्पोर्ट-एक्स्पोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक अत्यंत महत्त्वपूर्ण व सकारात्मक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी जुन्या प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधून त्यांच्या आयात-निर्यात व्यवसायातील अडचणी, अनुभव व अपेक्षा सखोलपणे समजून घेतल्या. तसेच मार्गदर्शनही केले.

राज्याच्या विविध जिल्ह्यांतून अमृत इम्पोर्ट-एक्सपोर्ट प्रशिक्षण उपक्रमाचे लाभार्थी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त संजय पंडित, अमृत मुख्यालयातील ज्येष्ठ लिपिक प्रणव कुलकर्णी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी यांनीही लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रत्येक लाभार्थ्याच्या आयात-निर्यात व्यवसायातील अडचणी ऐकून घेतल्या व मार्गदर्शन केले. अशी बैठक दर पंधरवड्याला नियमितपणे घेण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. लाभार्थ्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी नागपूरचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये लाभार्थ्यांनी आपले प्रश्न कोणताही संकोच न बाळगता मांडले. त्यातून सकारात्मक चर्चा झाली आणि प्रत्येकाला योग्य दिशा व आत्मविश्वास मिळाला. 'अमृत संस्था आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे,' ही भावना या बैठकीनंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसून आली. या बैठकीमुळे सर्व लाभार्थ्यांना नवसंजीवनी, आत्मविश्वास आणि नव्याने सुरुवात करण्याची ऊर्जा मिळाली. या उपक्रमाबद्दल सर्व लाभार्थ्यांनी अमृत संस्थेचे आणि विजय जोशी यांचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Devdatta Pandit News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 03:23 PM News publication time | Views: 198 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Devdatta Pandit News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 03:23 PM News publication time | Views: 198 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words