अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य

हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना अमृत दिनदर्शिका सादर

अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली : राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेली महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत'ने तयार केलेली अमृत दिनदर्शिका हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना भेट म्हणून देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत सखोल चर्चा झाली.

तहसीलदार श्री. भुजबळ यांनी अमृत दिनदर्शिका पाहून त्यातील योजनांची मांडणी, माहितीचा नेमकेपणा आणि तिची नागरिकांसाठीची उपयुक्तता याबाबत विशेष कौतुक केले. 'ही केवळ दिनदर्शिका नसून, शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे महत्त्वाचे साधन आहे,' असे त्यांनी नमूद केले.

अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणी किंवा प्रशासकीय समस्या असतील, तर त्यांचे निराकरण करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ठाम आश्वासन श्री. भुजबळ यांनी दिले.

महिला, युवक व तळागाळातील घटकांच्या सक्षमीकरणासाठी अमृतमार्फत राबविण्यात येणारे कौशल्यविकास व स्वयंरोजगार उपक्रम प्रशासकीय पातळीवरून अधिक बळकट केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीमुळे अमृत व तालुका प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 01:42 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 01:42 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words