भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी दिल्या शुभेच्छा
अहिल्यानगर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव नवनाथ विष्णू पडळकर, तसेच अहिल्यानगर शहर जिल्हा प्रभारी यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. अमृत संस्थेच्या योजनांविषयी त्यांनी जाणून घेतले. तसेच कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहितीसाठी
पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment