'अमृत'ची दिनदर्शिका म्हणजे भविष्याची दिशा दर्शवणारे साधन

छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्ष्यित गटातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद

'अमृत'ची दिनदर्शिका म्हणजे भविष्याची दिशा दर्शवणारे साधन मुख्य फोटो
'अमृत'ची दिनदर्शिका म्हणजे भविष्याची दिशा दर्शवणारे साधन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे वाटप छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात करण्यात आले. या उपक्रमामध्ये लक्ष्यित गटातील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती असलेली दिनदर्शिका देण्यात आली.

अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, लाभ घेण्याची प्रक्रिया, तसेच संपर्कासाठी आवश्यक माहिती सोप्या भाषेत छापण्यात आली आहे. त्यामुळे लक्ष्यित गटातील नागरिकांना शासनाच्या योजना समजून घेणे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी थेट संपर्क साधणे आगामी काळात अधिक सोपे होणार आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील पौरोहित्य करणाऱ्या, तसेच विविध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी या दिनदर्शिकेचे विशेष कौतुक केले. “सर्व माहिती एका ठिकाणी मिळाल्यामुळे आपल्याला अधिक माहिती नेमक्या कोणत्या विषयाची घ्यायची हे ठरवणे सोपे झाले आहे,” अशी प्रतिक्रिया लक्ष्यित गटातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली. दिनदर्शिका हा माहितीचा उपयोगी स्रोत ठरत असल्याचे मतही नागरिकांनी मांडले.

अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंखे यांनी नागरिकांशी व्यक्तिगत संपर्क साधून दिनदर्शिकांचे वाटप केले. त्यांनी लक्ष्यित गटातील नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. अमृत संस्थेचा उद्देश लक्ष्यित गटातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे हा असून, या दिनदर्शिकेमुळे लक्ष्यित गटातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे अमृत स्वायत्त संस्थेचे कार्य लक्ष्यित गटातील लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,

पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 05:54 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 05:54 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words