हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याकडून कौतुक
सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. अमृत संस्थेचे सातारा जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका भेट दिली. या वेळी पावसकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याविषयी जाणून घेतले आणि कौतुक केले.
अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधनकार्य आणि युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण योजनांची माहिती विक्रम पावसकर यांना देण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
'अमृत ही संस्था समाजातील युवकांना दिशा देण्याचे आणि संशोधनाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे उत्तम काम करत आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थेचे विचार घराघरात पोहोचतील. संस्थेच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा,' अशा शब्दांत पावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment