योजनांची माहिती देऊन पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे करण्यात आले आवाहन
बिलोली (जि. नांदेड) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे बिलोली येथे आर्य वैश्य समाज आणि ब्राह्मण समाज संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांचा बैठकीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अमृत संस्थेच्या कार्याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. बैठकीत बिलोलीचे माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, बिलोली आर्य वैश्य संघटनेचे अध्यक्ष महेश तांडुरवार व अर्जापूर कॉलेजचे प्राचार्य श्री. चौधरी यांच्यासह लक्ष्यित घटकांतील समाजबांधव उपस्थित होते.
अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक विश्वजित कांबळेदेखील उपस्थित होते. बैठकीत जोशी यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अधिकाधिक पात्र व्यक्तींनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. एमसीईडीचे समन्वयक विश्वजित कांबळे यांनी अमृत संस्थे एमसीईडीच्या संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या योजनांची माहीती दिली. अर्जापूर कॉलेजचे प्राचार्य श्री. चौधरी यांनीही विद्यार्थी आणि लाभार्थी अमृत संस्थेशी जोडून देण्याबाबत आश्वासन दिले.
संपर्क : विश्वेश्वर जोशी - 8600240032
नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment