महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अमृत’मार्फत महिलासक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. स्थानिक लघुउद्योजक तसेच लक्षित गटातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या विक्री कौशल्याला चालना मिळावी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने व्यवस्थापकीय संचालक (अमृत) यांच्या संकल्पनेतून ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ हा उपक्रम राबविण्यात आला.
महाड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने आयोजित ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला महाड येथे ग्राहकांचा उत्स्फूर्त व हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. श्री वीरेश्वर मंदिर सभागृह, महाड येथे दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नवउद्योजकांनी सहभाग घेत आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांपर्यंत सादरीकरण व विक्री केली.
वंदे मातरम्च्या जयघोषाने आणि दीपप्रज्वलनाने ‘अमृतपेठ’ची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकतेचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. या उपक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली. एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्राने विशेष सहकार्य केले. अमृतपेठमधील उद्योजिका तसेच बाजारपेठेला भेट देणाऱ्या ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. व्यवसायासोबतच समाजासाठी योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या बाजारपेठेत घरगुती पिठे, हस्तकलेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विणकामाच्या वस्तू, घरगुती मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, सोलर प्रणालीवर चालणारी उपकरणे, महिलांनी हाताने तयार केलेल्या आकर्षक पर्स यांसह विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली.
‘अमृतपेठ’चे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे श्री. शरददादा गांगल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक श्री. शिवराजजी भागवत, महाड नगरपरिषदेचे नगरसेवक अॅड. श्री. सनी जाधव, सौ. विद्याताई देसाई, मणिरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संस्थापक सौ. ममता मेहता, तसेच मणिरीच्या स्वयंसेविका सौ. दीप शेट, सौ. कांचन महाडीक, सौ. गायत्री बोरगावकर, सौ. मृणाल शेट, श्री. रोशनजी भुवड, विशानेमा गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रियंका गुजर आणि प्रभात कॉलनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्री मेहता यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी सहकुटुंब ‘अमृतपेठ’ला भेट देत नवउद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. व्यवसाययोग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे ही आजच्या काळाची गरज असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
तीन दिवस चाललेल्या या बाजारपेठेला महाड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना पसंती दिली. ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नवउद्योजकांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला. ‘अमृतपेठ’ यशस्वी करण्यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश मराठे, उपव्यवस्थापक श्री. मंगेश ढेबे, अमृतसखी जान्हवी साठे तसेच स्थानिक अमृत मित्र विक्रांत बुटाला आणि केदार पुरोहित यांनी अथक परिश्रम घेतले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी संपर्क :
रायगड जिल्हा व्यवस्थापक : ९११२२२८७५९
श्री. शैलेश मराठे : ९४२३८९२१८२
श्री. मंगेश ढेबे : ८१४९५५२१४३
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment