गडहिंग्लज :महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या उपक्रमांतर्गत "साधना हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज"येथे आयोजित ‘अमृत वर्गा’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्गामध्ये २० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उत्साहाने विविध खेळांमध्ये व व्यायाम प्रकार आणि इतर उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, शिस्त, एकाग्रता, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, हा ‘अमृत वर्गा’ मागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता शारीरिक सुदृढता, मानसिक एकाग्रता, संघटन कौशल्य सामाजिक सदभावना आणि नेतृत्वक्षमतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम घेण्यात आले.
उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत विविध कृती व व्यायामांमध्ये सहभाग घेतला. एकत्रितपणे केलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘मी’पेक्षा ‘आपण’ ही भावना, शिस्त आणि संघभावना अधिक दृढ होताना दिसून आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि सक्रिय सहभागामुळे ‘अमृत वर्गा’चा उद्देश साध्य झाल्याची भावना शिकक्षांनी व्यक्त केली व हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात अमृत मित्र शिरिष कुलकर्णी यशस्वी झाले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सकारात्मक विचारसरणी तसेच ऐत्याहासिक विषयीचे ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी ‘अमृत वर्ग’ हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत करणारा आणि त्यांच्यातिल सुप्त गुण व क्षमतांना दिशा देणारा उपक्रम ठरत आहे, अशी देखिल भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. २० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे साधना हायस्कूलमधील ‘अमृत वर्गा’ ने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी पाऊल पुढे टाकले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment