राहुरीतील कम्प्युटर प्रशिक्षण केंद्राला अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट

लाभार्थ्यांशी साधला संवाद

राहुरीतील कम्प्युटर प्रशिक्षण केंद्राला अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट मुख्य फोटो
राहुरीतील कम्प्युटर प्रशिक्षण केंद्राला अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरीमध्ये कम्प्युटर सायन्स व हार्डवेअर नेटवर्किंगचे प्रशिक्षण चालू आहे. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी व अमृतमित्र शरद क्षीरसागर यांनी या प्रशिक्षण केंद्रात जाऊन पाहणी केली आणि लाभार्थ्यांची भेट घेतली. या वेळी दीपक जोशी, पृथा बल्लाळ, अक्षय कुलकर्णी, रेणुका झांबरे, शुभंकर जोशी, पूर्वा बल्लाळ, राजश्री दीपक जोशी, अविनाश जोशी, जगदीश सातभाई, गजानन सातभाई उपस्थित होते.

पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

अहिल्यानगर - 414003

संपर्क क्रमांक : 9112228769

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 1,060 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 1,060 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words