अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची मांडली भूमिका
अहिल्यानगर : राहुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजेंद्र सातभाई यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र श्री. सातभाई यांची भेट घेऊन सुपुर्द केले. या वेळी अमृतमित्र शरद क्षीरसागर, दीपक जोशी उपस्थित होते. त्यांच्या आगामी समाजकार्याला यश लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. राहुरी शहर व परिसरातील गरजू आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका सातभाई यांनी मांडली.
या वेळी झालेल्या संवादात गजेंद्र सातभाई यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अमृत ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे,याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी निवडणुकीपूर्वी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.
पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment