'माहितीचे पॉवरहाउस' ठरलेल्या अमृत दिनदर्शिकेचे बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्व पातळ्यांवर वितरण

'माहितीचे पॉवरहाउस' ठरलेल्या अमृत दिनदर्शिकेचे बुलढाणा जिल्ह्यात स्वागत  मुख्य फोटो
'माहितीचे पॉवरहाउस' ठरलेल्या अमृत दिनदर्शिकेचे बुलढाणा जिल्ह्यात स्वागत  अतिरिक्त फोटो

बुलढाणा : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. आपल्या संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी अमृत संस्थेने खास दिनदर्शिका तयार केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अमृत दिनदर्शिकेचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, या उपक्रमामुळे प्रशासन, माध्यमे आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती थेट पोहोचवणारी ही दिनदर्शिका जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व स्तरांवर पोहोचवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांचा खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत दिनदर्शिका म्हणजे माहितीचे पॉवरहाउस आहे. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती, पात्रतेच्या अटी, लाभ याविषयीचे मार्गदर्शन स्पष्टपणे करण्यात आले असून, ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. 'अमृत दिनदर्शिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहोचतील आणि नागरिक प्रत्यक्ष लाभ घेण्यास सक्षम होतील,' अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया अधिकारीवर्गाकडून व्यक्त झाली.

मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अमृत दिनदर्शिकेचा प्रचार सुरू असून, हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे.

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 08:16 AM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 08:16 AM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words