आमदार विक्रम पाचपुते यांना अमृत दिनदर्शिका भेट

अमृत संस्थेच्या कार्याबद्दल दिला सकारात्मक प्रतिसाद

आमदार विक्रम पाचपुते यांना अमृत दिनदर्शिका भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांची भेट घेऊन अमृत दिनदर्शिका त्यांना भेट दिली. या वेळी भाजपचे नगर तालुका माजी अध्यक्ष मनोज कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष निमसे आणि नीलेश दरेकर उपस्थित होते. अमृत संस्थेच्या योजनांबद्दल आणि दिनदर्शिकेबद्दल मान्यवरांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करून शक्य ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

कार्यालय पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

अहिल्यानगर - 414003

संपर्क क्रमांक : 9112228769

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 10:07 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 10:07 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words