अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात झाली आढावा बैठक
अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी अमृतमित्र वैभव कुलकर्णी, शरद क्षीरसागर, गौरी कुलकर्णी उपस्थित होते. जानेवारी महिन्यातील प्रवास, लक्ष्यित गटातील भेटी, शाळा-महाविद्यालय भेटी यांचे नियोजन करण्यात आले. अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. तसेच अमृतपेठ आणि अमृत संस्थेच्या शैक्षणिक योजनांवरही काम करावे, असे आवाहन भोपे यांनी केले. अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यांमध्ये अमृत संस्थेचे कार्य पोहोचण्यासाठी अहिल्यानगरची टीम यशस्वी झाली असून, पुढेही हे कार्य अधिक जलद गतीने व्हावे, यासाठी सर्व टीम प्रयत्न करणार आहे, असे भोपे यांनी सांगितले.
कार्यालय पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment