मसाल्याचा व्यवसाय देणार परभणीतील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग

अमृत संस्थेच्या मसाला उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

मसाल्याचा व्यवसाय देणार परभणीतील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग मुख्य फोटो
मसाल्याचा व्यवसाय देणार परभणीतील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग अतिरिक्त फोटो

परभणी : अमृत ही शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीत एक महिना कालावधीचा मसाला उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा नुकताच समारोप झाला. या वेळी अमृत संस्थेचे राज्य समन्वयक दीपक जोशी यांनी आभासी पद्धतीने उपस्थित राहून प्रशिक्षणार्थी महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अमृत संस्था आपल्यासाठी सदैव कटिबद्ध असेल अशी ग्वाही दिली. 

कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले. अमृत संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना कसा मिळवून देण्यात येईल, याबाबतही त्यांनी माहिती दिली. जिल्हा उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले. एमसीईडीचे परभणी प्रकल्प अधिकारी काशिनाथ राठोड यांनी लाभार्थ्यांना सीएमईजीपी या योजनेबद्दल माहिती देऊन लाभार्थ्यांनी आपले व्यवसाय लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 

या वेळी लाभार्थी महिलांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सौ. माधुरी उमरेकर यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा झाल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केली. मीनाक्षी दडके यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. सर्व महिलांनी व्यवसाय उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत परभणी जिल्हा कार्यालय,

जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,

बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.

मोबाइल : 7391065473

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 09:38 PM News publication time | Views: 323 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 09:38 PM News publication time | Views: 323 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words