अमृत संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिन्याभराच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
गंगाखेड (परभणी) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिन्याभराच्या आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा नऊ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. हे प्रशिक्षण निःशुल्क होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, जिल्हा उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी आणि 'एमसीईडी'चे प्रकल्प अधिकारी काशिनाथ राठोड यांची उपस्थिती होती.
'लवकरात लवकर उद्योग सुरू करावेत, असे आवाहन अनिरुद्ध काटे यांनी महिलांना केले आणि यशस्वी उद्योजिका बनून स्वावलंबी होण्यासाठी कानमंत्र दिला. त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना अमृत संस्थेच्या विविध योजना आणि विशेषतः वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र आणि अमृत २०२६ दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
या वेळी प्रशिक्षणार्थी वंदना पेकम, अर्चना कवठेकर, वैशाली कोकडवार अश्विनी पुंडलिक, श्वेता पालीमकर यांनी प्रशिक्षणात आलेले अनुभव मांडले. पैठणमध्ये व्यावसायिक सहल आयोजित केल्याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया बंडावार यांनी केले. प्रशिक्षणाच्या प्रशिक्षिका दिव्या कोटलवार यांनी आभारप्रदर्शन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment