नागपूरच्या संक्रांती स्पेशल प्रदर्शनात अमृतपेठ ई-कॉमर्स बाजारपेठेचा बोलबाला

अमृतसखी व अमृतमित्र यांनी केली जागृती

नागपूरच्या संक्रांती स्पेशल प्रदर्शनात अमृतपेठ ई-कॉमर्स बाजारपेठेचा बोलबाला मुख्य फोटो
मुख्य फोटो

नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने अमृतसखी व अमृतमित्र यांनी नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या संक्रांती स्पेशल प्रदर्शनाला भेट दिली. तिथे उपस्थित उद्योजक, कारागीर आणि नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला. या भेटीमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या हस्तकलेचे भव्य आणि उत्कृष्ट नमुने सादर करण्यात आले होते. स्थानिक कारागीर व लघुउद्योजकांनी सादर केलेली उत्पादने पाहून उपस्थितांनी कौतुक केले. याच प्रदर्शनात अमृतपेठ या ई-कॉमर्स बाजारपेठेशी संलग्न लाभार्थीही सहभागी झाले होते.

अनेक उद्योजक व कारागीरांनी अमृतपेठ या ऑनलाइन बाजारपेठेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्या उत्पादनांना राज्य व देशपातळीवर पोहोचवण्याची संधी अमृतपेठमुळे उपलब्ध होत असल्याचे समजल्यावर अनेकांनी तत्काळ नोंदणी केली. अमृत संस्थेमार्फत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपला व्यवसाय अधिक सक्षम होईल, अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमामध्ये अमृतसखी दर्शना जाब्रस, तसेच अमृतमित्र निखिल देशपांडे यांनी सक्रिय सहभाग घेऊन, अमृत संस्थेच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवली. या भेटीमुळे अमृत संस्थेच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. लाभार्थ्यांनी अमृत संस्थेचे आभार मानून अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक ठिकाणी राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपर्क :

हर्षल गद्रे - ९११२२२८७७३

नागपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा कार्यालय,

शिवाजीनगर, ८०/बी, पहिला मजला, नागपूर.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 646 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 646 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words