नांदेडमधील समाजसेविका सौ. श्रद्धाताई चनाखेकर अमृत संस्थेला करणार समन्वयकाच्या भूमिकेतून सहकार्य

अमृत संस्थेतर्फे सत्कार

नांदेडमधील समाजसेविका सौ. श्रद्धाताई चनाखेकर अमृत संस्थेला करणार समन्वयकाच्या भूमिकेतून सहकार्य मुख्य फोटो
नांदेडमधील समाजसेविका सौ. श्रद्धाताई चनाखेकर अमृत संस्थेला करणार समन्वयकाच्या भूमिकेतून सहकार्य अतिरिक्त फोटो

नांदेड : येथील समाजसेविका सौ. श्रद्धाताई सतीशराव चनाखेकर यांनी अमृत संस्थेच्या आमंत्रणाचा स्वीकार करून अमृत संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल जाणून घेतले आणि त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. अमृत संस्थेतर्फे विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे, नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी सौ. चनाखेकर यांचा सत्कार केला. संगणकसखी मयुरी टेळकीकर व संजना कुलकर्णी याही या वेळी उपस्थित होत्या.

अमृत संस्थेच्या कार्यासाठी समन्वयकाच्या भूमिकेतून मदत करण्याची तयारी सौ. चनाखेकर यांनी दर्शवली. ब्राह्मण समाजात विवाह जुळवण्यासंदर्भात सौ. चनाखेकर यांनी मोठे कार्य केले आहे. आतापर्यंत त्यांनी ब्राह्मण समाजात सुमारे २५० विवाह जमवले आहेत.

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words