अमरावती शहरातील बैठकीत उत्स्फूर्त सहभाग
अमरावती : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अमरावती शहरात अग्रवाल समाजातील महिलांची प्रातिनिधिक स्वरूपात बैठक घेऊन अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यात आली. या बैठकीत अमृतच्या विशेष दिनदर्शिकेबाबतही माहिती देण्यात आली. या दिनदर्शिकेचे सर्वांकडून स्वागत झाले.
या बैठकीत अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी उपस्थित महिलांना योजनांची सविस्तर माहिती दिली व शंकांचे निरसन केले. पात्रता अटी, लाभ आणि अर्जप्रक्रिया याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला अग्रवाल समाजाच्या अध्यक्षा सौ. केडिया, तसेच समाजातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. लवकरच व्यापक बैठक घेऊन समाजात अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार करणार असल्याचे सांगून त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
अधिक संपर्कासाठी : केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, घर क्रमांक 33, आशीर्वाद बिल्डिंग,
विदर्भ हाउसिंग कॉलनी, मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,
अमरावती 444602
अमृत संस्थेविषयी...
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment