नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमध्ये १० जानेवारीला आयोजन; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार माहिती
नांदेड : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था विविध प्रकारच्या योजना लक्ष्यित गटांसाठी राबवते. त्यात प्रशिक्षणापासून व्याजपरताव्याच्या रूपाने अर्थसाह्यापर्यंतच्या विविध योजनांचा समावेश आहे. अशा सर्व योजनांची माहिती देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे १० जानेवारी २०२६ रोजी सकळी ११ वाजता अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मेळाव्याला लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांनी उपस्थित राहून माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अशा योजनांची माहिती घेण्यासाठी मेळाव्याला येण्याचे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
दिवस आणि वेळ : १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता
ठिकाण : कुंचनवार फार्म हाउस, बोधन रोड, बिलोली, जि. नांदेड
अधिक माहितीसाठी संपर्क :
विश्वेश्वर जोशी 8600240032
नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
मेळाव्याला येताना खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेऊन याव्यात, असे कळवण्यात आले आहे.
आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला (TC/निर्गम), उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार), रहिवासी प्रमाणपत्र (तहसीलदार)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment