विविध समाजघटकांकडून झाले स्वागत
धुळे : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या धुळे कार्यालयातर्फे नवीन वर्षानिमित्त दिनदर्शिका वितरण करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या वतीने लक्ष्यित गटातील नागरिक, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, तसेच विविध सामाजिक घटकांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये उपयुक्त माहिती, सण-उत्सवांची नोंद तर आहेच, शिवाय संस्थेच्या विविध योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
या वेळी बोलताना अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सकारात्मक विचार पोहोचावा, तसेच सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजना व उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, हा या दिनदर्शिकेमागील मुख्य उद्देश आहे.”
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, प्रशिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अमृत संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे कौतुक केले. अमृत संस्था भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य सातत्यपूर्ण पद्धतीने राबवणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment