धुळ्यात राजपूत समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती

अमृत संस्थेच्या विशेष दिनदर्शिकेचे वितरण; मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

धुळ्यात राजपूत समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती मुख्य फोटो
मुख्य फोटो

धुळे : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. राजपूत समाजातर्फे धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. समाजातील नागरिकांपर्यंत योजनांचे फायदे पोहोचावेत, यासाठी अमृत संस्थेच्या विशेष दिनदर्शिकेचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल, तसेच नरेंद्रसिंह सिसोदिया आणि किरण सिसोदिया उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री. रावल यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अमृत संस्थेच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी दिली. पात्रता अटी, लाभ आणि अर्जप्रक्रिया याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विलास चंद्रात्रे यांनी आयोजनासाठी आणि अमृतसखी वैशाली कुलकर्णी यांनी समन्वयासाठी मेहनत घेतली. समाजातील अनेक मान्यवर, महिला-पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 10:49 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 10:49 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words