उद्योजक घडवण्याचे अमृत संस्थेचे प्रयत्न वाखाणण्यासारखे

कोल्हापूर जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त जमीर करीम यांच्याकडून कौतुक आणि सहकार्याचे आश्वासन

उद्योजक घडवण्याचे अमृत संस्थेचे प्रयत्न वाखाणण्यासारखे मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेची दिनदर्शिका देण्यासाठी, तसेच संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत संस्थेतर्फे अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. त्यात जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांची भेट अमृतचे कौशल्य विकास उद्यम प्रशिक्षक राजन डांगरे यांनी घेतली. उद्योजक घडवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकांकरिता कर्ज व्याजपरतावा योजना, अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर प्रशिक्षण, कोर्सेस, स्पर्धा परीक्षांसाठी अनुदान, स्टार्टअपसाठी अनुदान अशा विविध प्रकारे अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटासाठी योजना सुरू आहेत. त्यांची माहिती देण्यात आली. करीम यांनी अमृत संस्थेचे मनापासून कौतुक केले. एका शासकीय संस्थेने इतकी मेहनत घेऊन उद्योजक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न हे खूपच वाखाणण्यासारखे व कौतुकास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. आपणही उद्योजकांसाठी घेत असलेल्या कार्यक्रमांमध्ये अमृतची प्रसिद्धी व प्रचार नक्की करू, असे आश्वासन त्यांनी दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक शासकीय रोजगार मेळाव्यामध्ये 'अमृत' संस्थेचे स्वतंत्र स्टॉल्स लावले जाणार आहेत. जिल्हा कौशल्यविकास केंद्रातर्फे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या अधिकृत जाहिरातींमध्ये 'अमृत'च्या सहभागाचा स्पष्ट उल्लेख केला जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचेल. रोजगार मेळाव्याला येणाऱ्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील तरुणांना मोफत ट्रेनिंग कोर्सेसची माहिती दिली जाईल. प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मेळाव्याच्या ठिकाणी स्टॉल्सच्या माध्यमातून अमृतच्या योजनांच्या पत्रकांचे वाटप आणि समुपदेशन केले जाईल. अशा प्रकारे अमृत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही या चर्चेमध्ये आयुक्तांनी दिली.


अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 09:55 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 09:55 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words