अमृत संस्थेच्या प्रचार–प्रसारासाठी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे योगदान

अमृत संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आले विशेष आभार

अमृत संस्थेच्या प्रचार–प्रसारासाठी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे योगदान मुख्य फोटो
मुख्य फोटो

खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेच्या कार्याचा प्रचार–प्रसार खंडाळा तालुक्यात प्रभावीपणे व्हावा, यासाठी खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे मोलाचे योगदान आहे. अमृत दुर्गोत्सव २०२५च्या काळात अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी श्री. वाघमारे यांनी संस्थेच्या जाहिराती, माहितीपर संदेश, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यास सहकार्य केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अमृत संस्थेच्या योजना खंडाळा तालुक्यातील अनेक गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या.

अमृत संस्थेचे समन्वयक अविनाश अनंत कुलकर्णी यांनी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांची समक्ष भेट घेऊन सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. या वेळी अमृत संस्थेची माहिती असलेली दिनदर्शिका व माहितीपत्रके त्यांना सादर करण्यात आली. श्री. वाघमारे यांनी अमृत संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करून भविष्यातही अशा उपक्रमांना प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 11:41 PM News publication time | Views: 515 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 11:41 PM News publication time | Views: 515 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words