नांदेडमध्ये सध्या सुरू आहे भव्य कार्यक्रम
नांदेड : येथे शिवमहापुराण कथा हा भव्य कार्यक्रम सध्या सुरू आहे. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी तिथे जाऊन प्रसिद्ध शिवमहापुराण कथा निरूपणकार समाधानमहाराज शर्मा यांना अमृत दिनदर्शिका दिली. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. अमृत संस्थेसाठी लवकरच एक बाइक भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment