अन्य विविध मान्यवरांनीही केले अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक
गेवराई (जि. बीड) : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या उपक्रमांना गेवराई येथे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बाळराजे पवार हे भारतीय जनता पक्षाचे गेवराई येथील ज्येष्ठ नेते आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. गीताभाभी पवार या गेवराईच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची अलीकडेच अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. अमृत दिनदर्शिका त्यांना भेट म्हणून देण्यात आली.
या भेटीवेळी बाळराजे पवार यांनी अमृत संस्थेचे कार्य, उद्दिष्टे, लक्ष्यित गट, तसेच समाजासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. अमृत संस्था कोणासाठी कार्य करते आणि समाजाच्या विकासात ती कोणत्या प्रकारे योगदान देत आहे, याबाबत बराच वेळ सखोल चर्चा झाली. यावेळी त्यांनी अमृत संस्थेच्या कार्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने सहकार्य करू शकतो, याबाबतही आपली सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारे सामाजिक, शैक्षणिक, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती ऐकून त्यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक केले व पुढील काळात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याच दिवशी गेवराई येथील नगरसेवक राजेंद्र राक्षसभुवनकर, किशोर धोंडलकर, माजी नगरसेवक कृष्णाभैया मुळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. या सर्व मान्यवरांनादेखील अमृत संस्थेची माहिती देऊन अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली. अमृत संस्थेच्या उपक्रमांबाबत या मान्यवरांनीही सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला.
या भेटीवेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, तसेच अमृतमित्र सुमित धिरडे उपस्थित होते. गेवराई येथे दिवसभरात झालेल्या विविध भेटींमुळे अमृत संस्थेच्या कार्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असून, समाजातील विविध घटकांपर्यंत अमृतचे उपक्रम पोहोचण्यास बळ मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment