हिंदू महासभेचे पंढरपूर अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी घेतली अमृत संस्थेची माहिती

अहिल्यानगर दौऱ्यात सागर भोपे यांनी घेतली भेट

हिंदू महासभेचे पंढरपूर अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी घेतली अमृत संस्थेची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : हिंदू महासभेचे पंढरपूर अध्यक्ष अभय कुलकर्णी, पत्रकार महेश खिस्ते, यशवंत बेणारे, विकास मोरे आणि दत्तात्रय देशपांडे नुकतेच अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांची भेट घेतली. अमृत संस्थेची दिनदर्शिका देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना अमृत संस्थेची सविस्तर माहिती देण्यात आली. पंढरपूरमध्ये अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मकता त्यांनी दाखवली.

अमृत ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. 

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

अहिल्यानगर संपर्क : 9112228769.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 212 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 06:26 PM News publication time | Views: 212 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words