लघुउद्योग भारती संस्थेने व्यक्त केली अमृत संस्थेसोबत संयुक्त उपक्रम राबवण्याची इच्छा

नागपूरमध्ये संस्थेचे सहसचिव निरंजन शिरपूरकर यांनी केले 'अमृत'च्या उपक्रमांचे कौतुक

लघुउद्योग भारती संस्थेने व्यक्त केली अमृत संस्थेसोबत संयुक्त उपक्रम राबवण्याची इच्छा मुख्य फोटो
लघुउद्योग भारती संस्थेने व्यक्त केली अमृत संस्थेसोबत संयुक्त उपक्रम राबवण्याची इच्छा अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या प्रतिनिधींनी लघुउद्योग भारती संस्थेचे सहसचिव निरंजन शिरपूरकर यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती या भेटीमध्ये त्यांना देण्यात आली. या वेळी निरंजन शिरपूरकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून, भविष्यात लघुउद्योग भारती संस्था व अमृत यांच्यात समन्वय साधून संयुक्त उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. अशा सहकार्यामुळे उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमृत संस्थेच्या उद्दिष्टांबाबत, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व लघू-मध्यम उद्योजकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेबाबत माहिती ऐकून श्री. शिरपूरकर यांनी विशेष रुची दाखवली. ही योजना उद्योजकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच अमृत पेठ योजनेबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली. अमृत पेठ या ई-कॉमर्स उपक्रमाशी त्यांचे उद्योग कशा प्रकारे जोडता येतील, उत्पादनांची नोंदणी प्रक्रिया, विक्री व प्रचाराची संधी याबाबत त्यांनी सखोल माहिती जाणून घेतली. आपल्या संस्थेशी संबंधित उद्योजक व उद्योग अमृत पेठच्या माध्यमातून कशा प्रकारे जोडता येतील, यावर सकारात्मक चर्चा झाली.

भेटीमध्ये अमृत संस्थेची दिनदर्शिका निरंजन शिरपूरकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. अमृत संस्थेच्या माध्यमातून होत असलेले उपक्रम, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच गरजू घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in






Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 12:55 PM News publication time | Views: 183 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 12:55 PM News publication time | Views: 183 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words