घोटमुंधारी व इंद्रापुरी येथील कार्यक्रमांमध्ये अनेकांनी जाणून घेतली योजनांची माहिती
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेल्या अमृत दिनदर्शिकेचे वितरण आणि योजनांविषयी जनजागृती करणारे उपक्रम नागपूर जिल्ह्यात उत्साहात पार पडले. घोटमुंधारी (ता. मौदा) येथील बौद्धविहार परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी, कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांना अमृत दिनदर्शिका वितरित करण्यात आली.
इंद्रापुरी (ता. मौदा) येथे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित जनसंवाद बैठकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना, पात्रता अटी, अर्जप्रक्रिया व लाभ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी आपल्या अडचणी व सूचना मांडून प्रतिनिधींशी थेट संवाद साधला.
अमृत संस्थेची दिनदर्शिका संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, सध्या तिचे वितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून लक्ष्यित घटकांतील नागरिकांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती सोप्या व सुलभ पद्धतीने समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी दिनदर्शिकेचे विशेष कौतुक केले.
या उपक्रमांमुळे अमृत संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
हर्षल गद्रे - ९०९६३१५१६५
नागपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता :
अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा कार्यालय,
शिवाजीनगर, ८०/बी, पहिला मजला, नागपूर.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment