नांदेडमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर आणि डॉ. संतोष शिरडकर यांनी व्यक्त केला आनंद
नांदेड : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, योजनांची माहिती देण्यासाठी संस्थेने दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व लाइफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर आणि डॉ. संतोष शिरडकर यांची भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. त्या वेळी अमृत संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर चर्चा झाली. दोन्ही मान्यवरांनी अमृत संस्थेच्या कार्याविषयी आनंद व्यक्त केला. आपल्या संपर्कात येणाऱ्या लक्ष्यित गटातील गरजू व्यक्तींना या संस्थेविषयी सांगून, योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्याचे सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment