मालेगाव शहरात अमृत दिनदर्शिकेचे मान्यवरांना वितरण

लक्ष्यित गटातील नागरिकांनी अमृत संस्थेबाबत व्यक्त केला सकारात्मक दृष्टिकोन

मालेगाव शहरात अमृत दिनदर्शिकेचे मान्यवरांना वितरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

मालेगाव (जि. नाशिक) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे विशेष दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये वितरण केले जात आहे. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या दिनदर्शिकेचा उद्देश असून, त्या दिनदर्शिकेमध्ये हिंदू पंचांगाचाही समावेश आहे.

मालेगाव शहरात पुण्यनगरीचे संपादक ब्रिजमोहन शुक्ला, लोकमत उपसंपादक प्रवीण साळुंके, मालेगाव जिल्हा संघचालक अशोक कांकरिया, पाटीदार समाजप्रमुख रमेश पटेल, सीए भावेश पटेल, राजपूत समाज अध्यक्ष खंडू परदेशी, लाला परदेशी, अनिल परदेशी, कापड व्यापारी माजी अध्यक्ष ललित शर्मा, नागराज रावळ, पीयूष शर्मा, अमृतमित्र अजिंक्य कन्नल, सतीश अग्रवाल यांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. मान्यवरांकडून दिनदर्शिकेचे स्वागत करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. 

https://mahaamrut.org.in/


Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:13 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:13 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words