अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेबद्दल मान्यवरांचे गौरवोद्गार

येवल्यामध्ये झाले वितरण

अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेबद्दल मान्यवरांचे गौरवोद्गार मुख्य फोटो
मुख्य फोटो

येवला (जि. नाशिक) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे विशेष दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये वितरण केले जात आहे. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या दिनदर्शिकेचा उद्देश असून, त्या दिनदर्शिकेमध्ये हिंदू पंचांगाचाही समावेश आहे.

येवल्यामध्येही या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. त्यात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आबा महाजन, निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी पंकज नेवसे, महसूल नायब तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी निरंजना पराते, गटविकास अधिकारी (पंचायत समिती) संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, येवला येथील विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. पाटील, येवल्याच्या परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा देशमुख आणि कार्यकारी सदस्यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. सर्वांनी दिनदर्शिकेचे स्वागत केले.

अमृत संस्थेविषयी : 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. 

https://mahaamrut.org.in/


Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:10 PM News publication time | Views: 100 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:10 PM News publication time | Views: 100 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words