योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांचा 'अमृत'च्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे वाढला ओघ
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार करण्यात आलेली दिनदर्शिका समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व संपर्काची माहिती दिल्यामुळे लक्ष्यित गटातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे.
दिनदर्शिका नागरिकांच्या घराघरात पोहोचल्याने अनेकांनी अमृत संस्थेच्या योजनांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, स्वावलंबन, महिला व युवकांसाठीच्या योजनांविषयी विचारणा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर, अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे हे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला योजनांची सविस्तर, सोपी व समजेल अशा भाषेत माहिती देत आहेत. पात्रता, अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
अमृतची ही दिनदर्शिका केवळ तारखा दाखवणारी नसून, समाजाच्या विकासासाठी उपयुक्त माहिती देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. योजनांची माहिती योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्यास समाजातील अनेक घटकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो, हे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको,
पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment