दर्पणरत्न पुरस्काराबद्दल उमरी येथील पत्रकार नरेंद्र येरावार यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार

पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य

दर्पणरत्न पुरस्काराबद्दल उमरी येथील पत्रकार नरेंद्र येरावार यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार मुख्य फोटो
दर्पणरत्न पुरस्काराबद्दल उमरी येथील पत्रकार नरेंद्र येरावार यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार अतिरिक्त फोटो

उमरी (जि. नांदेड) : नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड कार्यालयातर्फे नरेंद्र येरावार यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दर्पणरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. येरावार हे दैनिक पुढारीचे उमरी तालुका प्रतिनिधी आहेत. त्यांचा अमृत संस्थेतर्फे गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अमृत संस्थेच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मकता त्यांनी दर्शवली आहे.

दरम्यान, अलीकडेच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सौ. सायली कुलकर्णी-अपसिंगेकर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनाही अमृत संस्थेने शुभेच्छा दिल्या. सौ. कुलकर्णी सध्या बाहेरगावी असल्याने त्यांचे वडील आणि माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सत्कार स्वीकारला. 

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: विश्वेश्वर जोशी News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 07:57 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर जोशी News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 07:57 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words