अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत

भारतीय सण-उत्सव व शासकीय योजनांचा अनोखा संगम असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया

अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : 'अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेली दिनदर्शिका ही केवळ इंग्रजी तारखा दर्शवणारी नसून, ते खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण पंचांग ठरत आहे,' अशी प्रतिक्रिया अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांनी दिनदर्शिका स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. या दिनदर्शिकेमध्ये तारखांसह हिंदू पंचांगानुसार सर्व तिथीही अत्यंत स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. नक्षत्रे, शुभ-अशुभ दिवस, राहूकाळ, तसेच भारतीय सण-उत्सवांची सविस्तर व अचूक माहिती यात देण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती आकर्षक व सोप्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचत आहे. ही दिनदर्शिका एप्रिल २०२७पर्यंत म्हणजेच येत्या गुढीपाडव्यापासून सुरू होत असलेल्या संपूर्ण हिंदू वर्षभराची आहे. पंचांगातील माहिती अनेकांना समजणे अवघड जाते; मात्र अमृत संस्थेने ही माहिती साध्या, स्पष्ट आणि लोकाभिमुख स्वरूपात सादर करून पंचांग सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन वापरात आणले आहे. अशी सर्वसमावेशक, माहितीपूर्ण व परंपरेला आधुनिकतेची जोड देणारी दिनदर्शिका सहज पाहायला मिळाली नव्हती, अशी प्रतिक्रिया घाटनांद्रा येथील विनोद देशपांडे यांनी व्यक्त केली.

एकूणच, सामाजिक, सांस्कृतिक आणि माहितीपर दृष्टीने महत्त्वाची ठरणारी अमृतची ही दिनदर्शिका नागरिकांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरत असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमृत संस्थेच्या सर्व योजनांच्या माहितीसाठी संपर्क :
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 11:35 PM News publication time | Views: 281 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 11:35 PM News publication time | Views: 281 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words