अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेमुळे उद्योगाला आधार

ठाण्यातील वरद महाजन या युवा उद्योजकाला आतापर्यंत ६३, ७७३ रुपयांचा परतावा

अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेमुळे उद्योगाला आधार मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेमुळे उद्योगाला आधार अतिरिक्त फोटो

ठाणे : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ ठाण्यातील वरद महाजन यांना मिळाला आहे. रिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने महाजन यांचा व्यवसाय आहे.

वरद महाजन यांनी १२ लाख ११ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेसाठी त्यांचा अर्ज सर्व निकषांत बसल्यामुळे मंजूर झाला. त्यांना आतापर्यंत व्याजपरताव्याच्या रूपाने ६३ हजार ७७३ रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे व्याजपरताव्याची योजना त्यांना आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाणारी ठरत आहे. अमृत संस्थेमुळे व्यवसायाला खूप मोठा हातभार लागला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना? 

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: Darshan Kambri News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 09:35 PM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news
Publisher: Darshan Kambri News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 09:35 PM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words