अभिनेते आनंद प्रभू यांच्याकडून अमृतपेठ संकल्पनेचे कौतुक

अमृत संस्थेच्या योजनांची देण्यात आली माहिती

अभिनेते आनंद प्रभू यांच्याकडून अमृतपेठ संकल्पनेचे कौतुक मुख्य फोटो
मुख्य फोटो

नाशिक : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या प्रतिनिधींनी अभिनेते आनंद प्रभू यांची भेट घेतली आणि त्यांना अमृत संस्थेची माहिती दिली. अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दलही त्यांना सांगण्यात आले. अमृत संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका त्यांना भेट देण्यात आली. अमृतपेठ या उपक्रमात त्यांनी विशेष रस दर्शवला असून, एकंदरीतच संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आनंद प्रभू सध्या झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' या मलिकेत 'अधिराज' ही भूमिका साकारत आहेत.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 126 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 126 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words