अमृत संस्थेच्या योजनांची माहिती वर्षभर हाताशी

विशेष दिनदर्शिकेचे चंद्रपूर जिल्ह्यात स्वागत

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती वर्षभर हाताशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

चंद्रपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेने आपल्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका विशेष दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील शासकीय अधिकाऱ्यांना, तसेच अमृत योजनेच्या लाभार्थ्यांना या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
अमृत दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुरुवात जानेवारी २०२६ पासून होऊन एप्रिल २०२७ पर्यंत आहे. इंग्रजी कालगणनेबरोबरच या दिनदर्शिकेत हिंदू वर्ष, महिने आणि तिथींचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि लाभार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती यात समाविष्ट असल्यामुळे ही दिनदर्शिका केवळ तारखांची नोंद ठेवणारे साधन न राहता एक माहितीपूर्ण मार्गदर्शक साधन ठरत आहे.
मराठी परंपरा, पंचांग पद्धती आणि आधुनिक गरजांचा समन्वय साधणारी ही दिनदर्शिका अमृत संस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना पूरक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. लाभार्थी, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीही ही दिनदर्शिका उपयोगी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, अमृतमित्र श्रीरंग खोंड आणि सतीश नारायणदास उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9834323727
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: VIKRAM MOHAN PANDE News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 04:22 PM News publication time | Views: 334 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news
Publisher: VIKRAM MOHAN PANDE News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 04:22 PM News publication time | Views: 334 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words