लवकरच देणार नाशिक कार्यालयाला भेट
नाशिक : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या प्रतिनिधींनी प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना अमृत संस्थेची माहिती दिली. अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दलही त्यांना सांगण्यात आले. अमृत संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका त्यांना भेट देण्यात आली. लवकरच अमृत संस्थेच्या नाशिक जिल्हा कार्यालयात भेट देण्याचे आमंत्रण त्यांना देण्यात आले. ते त्यांनी स्वीकारले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment